अगाधीय क्षेत्रविभाग
खंडान्त उताराच्या मर्यादेपलीकडचा जास्त खोली असलेला महासागरातील हा जैव भौगोलिक प्रदेश असून महासागराचा हा सर्वांत खोल भाग आहे. याची खोली ...
अगाधीय टेकडी
सुस्पष्ट अशी समुद्रांतर्गत असलेली लहान टेकडी. ती अगाधीय (अतिशय खोल) समुद्रतळावर (सु. ३,००० ते ६,००० मी. खोल) काही मीटर ते ...
अगाधीय सागरी मैदान
महासागराच्या अनेक द्रोणी (Basin) यांमधील सर्वांत खोल भागातील सपाट व जवळजवळ समतल क्षेत्राला अगाधीय सागरी मैदान म्हणतात. ही मैदाने सामान्यपणे ...
अगुल्हास प्रवाह
आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्याजवळून वाहणारा हिंदी महासागरातील पृष्ठीय सागरी प्रवाह. दक्षिण गोलार्धात व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे हिंदी महासागरात भोवऱ्यासारखे चक्राकार सागरी प्रवाह ...
अंजदीव बेट
कर्नाटक राज्याच्या किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात स्थित असलेले एक छोटेसे बेट. अंजदीप या नावानेही हे बेट ओळखले जाते. कारवार हे कर्नाटकाच्या ...
अझोर्स द्वीपसमूह
उत्तर अटलांटिक महासागरातील द्वीपसमूह आणि पोर्तुगालचा स्वायत्त प्रदेश. क्षेत्रफळ २,३२२ चौ. किमी.; लोकसंख्या २,४२,७९६ (२०२४ अंदाजे). पोर्तुगालच्या मुख्य भूमीपासून पश्चिमेस ...
अँटिलीस बेटे
कॅरिबियन समुद्रातील वेस्ट इंडीज बेटांमधील अनेक बेटांचा समूह. वेस्ट इंडीजमधील बहामा वगळता उर्वरित सर्व बेटांना अँटिलीस या नावाने ओळखले जाते ...
अंध दरी
दोन्ही काठ उभ्या भिंतीप्रमाणे असलेली व भूमिगत जलप्रवाहांमुळे बनलेली दरी. जलप्रवाहाच्या शेवटी ही दरी तीव्र उताराच्या उभ्या भिंतींनी झाकली जाते ...
अन्जामेना शहर
मध्य आफ्रिकेतील चॅड देशाची राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ७,२१,०८१ (२०१८). हे देशाच्या नैर्ऋत्य भागात, चॅड-कॅमेरून सरहद्दीवर, शारी ...
अपघर्षण
पृष्ठभागाची मुख्यत: घर्षणाद्वारे झीज घडवून आणणाऱ्या क्रियेला अपघर्षण म्हणतात. वाळू, रेती, खडकाचा चुरा किंवा इतर डबरयुक्त जलप्रवाह, हिमनदी, वारा, सागरी ...
अफानासी निकितीन
निकितीन, अफानासी : (१४३३ – १४७२). (अफानस न्यिकीत्यिन). भारताला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी. रशियातील त्वेर येथे त्याचा जन्म झाला ...
अंबर मार्ग
प्राचीन काळात यूरोपातील उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्राच्या किनारी भागापासून भूमध्य समुद्र व एड्रिअॅटिक समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत अंबर या खनिज पदार्थाचा ...
अंबाजी नगर
गुजरात राज्याच्या बनासकांठा जिल्ह्यातील दांता तालुक्यात वसलेले एक प्रसिद्ध धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक तीर्थक्षेत्र. भारतातील सर्वांत प्राचीन असलेल्या अरवली पर्वतरांगांच्या ...
अमरावती शहर, आंध्र प्रदेश
भारतातील आंध्र प्रदेश राज्याची नव्याने स्थापन केलेली राजधानी. लोकसंख्या १,४०,००० (२०१८). राज्याची राजधानी म्हणून विकसित होत असलेले हे एक सुनियोजित ...
अयनदिन
अयनदिन हे वर्षातील दोन दिवस (प्रत्यक्षातील दोन क्षण) असून या दिवशी सूर्य त्याच्या सर्वांत उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या स्थानी असतो. वर्षातील ...
अरल समुद्र
मध्य आशियातील कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोन देशांत विस्तारलेला समुद्र. याला अरल सरोवर म्हणूनही ओळखले जाते. कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या ...
अरवली पर्वत
वायव्य भारतातील पर्वतरांग. तिचा विस्तार गुजरातपासून दिल्लीपर्यंत नैर्ऋत्य – ईशान्य दिशेत झालेला आहे. पर्वताची लांबी सुमारे ६०० किमी. असून गुरुशिखर ...
अलकनंदा नदी
गंगा नदीच्या दोन मुख्य शीर्षप्रवाहांपैकी एक शीर्षप्रवाह. भारताच्या उत्तराखंड राज्यातून वाहणारे अलकनंदा व भागीरथी हे गंगेचे दोन प्रमुख शीर्षप्रवाह आहेत ...
अलास्का पर्वतरांग
अलास्का पर्वतरांग (Alaska Mountain Range) : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अलास्का राज्यातील वेगवेगळ्या पर्वतरांगांपैकी एक प्रमुख पर्वतरांग. अलास्का हे राज्य उत्तर ...
